चाळीसगाव दारुबंदी विभागाची मोठी कारवाई, ५ लाख ७९ हजारांचा बनावट दारू साठा जप्त
हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक व्ही. टी. भूकन यांच्या आदेशाने चाळीसगाव विभागाचे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी के.एन. गायकवाड यांना मिळालेले गुप्त माहितीवरून अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवारात चोपडा अमळनेर रस्त्यावर सापळा रचून वाहन क्रमांक एम एच-३० बि.डी ११०३ या वाहनांमध्ये देशी विदेशी बनावट दारू साठा वाहतूक करतांना आढळून आला आहे.
सदर वाहनात बनावट देशी दारूचे टॅंगो पंच १८० मिली क्षमतेचे एकूण ५३ बॉक्स विदेशी दारू विस्की चे एकूण १० बॉक्स अशा प्रकारचे बनावट मध्ये साठा मिळवून आला आहे. सदर अवैध बनावट मद्य साठा वाहन असे एकूण ५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनासोबत मिळून आलेले इसम शुभम सुधाकर पाटील व कैलास देविदास वाघ या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाईत सहाय्यक दुय्यम निरीक्षक बि.डी बागले,भाऊसाहेब पाटील त्याचबरोबर एम.डी पाटील वाहन चालक यांनी सदरच्या कारवाई सहकार्य केले आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक के.एम गायकवाड चाळीसगाव तसेच व्ही. टी. भूकन अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या..
Unmesha Patil : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या भगव्या सप्ताहास जोरदार प्रतिसाद
Ajeet Pawar : विधानसभा निवडणुकीत ठरलं, हा आहे अजित पवार गटाचा “मेगा प्लॅन”