कंडारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ
हॅलो जनता, जळगाव
आज जंत नाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला – मुलींना उपकेंद्र कंडारी येथे व कार्यक्षेत्रातील उमाळा, देव्हारी, रायपूर, भागपूर, येथील शाळा, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडीत, उपस्थित तसेच शाळाबाह्य लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी समक्ष खाऊ घालून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली नाही त्यांना माँपअप राऊंड दिनांक- १० डिसेंबर २०२४ रोजी जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.
वय वर्ष १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला – मुलींना जंतनाशक गोळी देऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे व राज्यातील कृमी दोषाचे रुग्ण शून्यावर आणणे हा या राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. जंतामुळे बालकांमध्ये व किशोरवयीन मुला मुलींमध्ये ऍनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, वाढ खुंटणे, आदी आजारांचा धोका असतो यासाठी व्यापक नियोजन करून आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात व तालुक्यात दिनांक ०४ डिसेंबर २०२४ व माँपअप राऊंड दिनांक- १० डिसेंबर २०२४ दरम्यान १ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे जळगाव यांचे मार्गदर्शक सूचनांनुसार राबवली जात आहे.
उपकेंद्र कंडारी तालुका जळगांव येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.करिष्मा जैन, प्रा.आ.केंद्र नशिराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबवण्यात आली. पालकांनी जंतनाशक मोहिमेस सहकार्य करावे असे आवाहन कंडारी व कार्यक्षेत्रात आरोग्य सेवक एस. जी. ढाके यांनी केले आहे. जंतनाशक मोहिमेस आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक व नोडल शिक्षक, लोकप्रतिनिधी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक, यांचे सहकार्य लाभले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित
Anil Patil : मंत्री अनिल पाटलांनी विजयानंतर घेतले श्री मंगळ ग्रह देवेतचे दर्शन