हॅलो सामाजिक

आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….

हॅलो जनता, प्रतिनिधी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्यकडे रवाना झाले. पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल १०० जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्यात आली होती.

जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून उत्तम व्यवस्था पाहून या भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले. आम्हणा आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन. मनी शेवटली इच्छा होती रामन दर्शन लेवानी, मना किशोर आप्पांनी इच्छा पुरी करी. देव पण तेन्या सर्वा इच्छा पुऱ्या करी. असा आशीर्वाद यावेळी अयोध्येला जाणाऱ्या भाविकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार किशोर पाटील यांना देत आभार मानले आहेत…

शासन निर्णय १४ जुलै २०२४ अन्वये राज्यातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थश्रेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील एकुण ७३ तर महाराष्ट्र राज्यातील एकुण ६६ तिर्थस्थळांचा समावेश आहे.

या योजनेसाठी जळगांव जिल्हयाला एकुण १००० उदिष्ट होते. सदर योजनेअंतर्गत पहिल्या टप्यासाठी श्रीराम मंदिर, अयोध्या हे स्थळ निश्चीत करण्यात आले आहे सदर योजनेसाठी जिल्हयातुन एकुण ११७७ अर्ज प्राप्त झाले होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने एकुण ८०० लाभार्थीची या योजनेसाठी लॉटरी पध्दतीने निवड केली आहे. श्रीराम मंदिर, अयोध्या येथे जाण्यासाठी IRCTC यांच्या समंतीने रेल्वे प्रवासाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जळगाव रेल्वे स्थानकापासून या प्रवसाला सुरवात झाली असून येणाऱ्या यात्रेकरूंचे जळगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर पुष्प वृष्टी करून आरती ओवाळून त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर भगवान श्रीरामांचा जिवंत देखावा देखील तयार करत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस अयोध्या येथे थांबून दि.४/१०/२०२४ रोजी जळगांव येथे यात्रेचे परतीचे आगमन होणार आहे. आमची बऱ्याच दिवसांपासून अयोध्येला जाऊन भगवान श्रीरामांचे दर्शन घेण्याची इच्छा होते मात्र अनेक अडचणींमुळे हे शक्य झाले नाही. आज खरंच आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो आज आमचा आयोध्या ला जाण्याचा स्वप्न मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून पूर्ण होत आहे अशी भावना यात्रेकरूंनी व्यक्त केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट…

राजनंदिनी संस्थेतर्फे राज्यस्तरीय नारीरत्न पुरस्कार सौ. कोकिळा पाटील यांना प्रदान 

Vaishali Suryawanshi : ताई आमच्या गावात महिलांसाठी शौचालय नाही, लवकरच समस्यांचे निकारण करण्याची वैशाली सूर्यवंशी यांची ग्वाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button