मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची बैठक, संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांचे मार्गदर्शन

हॅलो जनता, मुक्ताईनगर –
मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची महत्वाची बैठक मुक्ताई मंदिर परिसरात संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कृषी केंद्र चालकांच्या चालू हंगामातील अडचणी, शासकीय नियमावली, खत-बियाण्यांचा पुरवठा यासारख्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित डीलर्सना मार्गदर्शन करताना संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी अत्यंत मोलाचे विचार मांडले.
बैठकीदरम्यान तालुका अध्यक्ष राम पाटील यांनी वैयक्तिक कारणामुळे पदाची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवण्याची विनंती केली. त्यामुळे सचिन पाटील यांची एकमुखाने मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्षपदी धीरज जैन सचिवपदी योगेश पाटील तर खजिनदारपदी राम पाटील यांचीही एकमताने निवड करण्यात आली.
या प्रसंगी जेष्ठ सदस्य दादाराव पाटील यांनी नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास तालुक्यातील अनेक नामवंत कृषी केंद्र चालक, सदस्य, व्यापारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
💥ब्रेकिंग 💥 निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार, यांची लागणार वर्णी….
💥 ब्रेकिंग : शिंदेसेनेची पाचोऱ्यात स्वबळाची तयारी? आज होणार फैसला
पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…