ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…
![](https://hellojanata.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241219-WA0003-780x470.jpg)
हॅलो जनता न्युज, जळगाव
अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात घडली आहे. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले.
मध्यरात्री 2:15 धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने चांदसर बु ता धरणगाव येथिल गिरणा नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर नायब तहसिलदार महसूल संदीप मोरे, मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बाविस्कर, मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे, तलाठी दत्तात्रय पाटील यांनी पकडले. घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक,मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण 12 ते 15 लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला.
अचानक हल्ला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह पथकातील सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे धाव घेतली. यावेळी तलाठी दत्तात्रय पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना पावड्याने,लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आली. तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर जाणीवपूर्वक फावडे मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहचले. दरम्यान, वाळू माफियांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी
मंगेश 2.0 पर्वाची झंझावाती सुरुवात, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर