पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…
हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. अशोक पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पोलिस ठाणे हद्दीत राजकीय पक्षपाती धोरणाने काम करीत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सामाजिक वादविवाद व किरकोळ भांडण प्रकरणी भाजप पदाधिकारी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत असताना अनेकदा पोलीस निरीक्षकांकडून अपमानास्पद वागणूक देत त्यांना पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचे प्रकार समोर आले आहे.
त्यामुळे भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाचोरा पोलीस स्थानकात सन्मानाची वागणूक मिळावी, पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्यासह त्यांच्या प्रभावाखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालय बदली करावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तरी या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप युवा मोर्चातर्फे देण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या…
रावेरमध्ये धनगर समाज आक्रमक, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर धनगर बांधवांचे रस्ता रोको
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव