Union Budget 2025 : अर्थसंकल्पात 12 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी खुशखबर !
हॅलो जनता न्युज, मुंबई :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 8व्या अर्थसंकल्पात (Union Budget 2025 ) एक महत्वाची घोषणा केली, ज्यामुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 12 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर आता कर लागू होणार नाही, अशी घोषणा सीतारामन यांनी केली. या नव्या कर व्यवस्थेअंतर्गत, 12 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या व्यक्तींना कर भरण्यापासून दिलासा मिळणार आहे. तथापि, हे फायदेमंद असणार आहे त्या व्यक्तींना, जे नवीन आयकर प्रणालीनुसार आयटीआर दाखल करतात.
याव्यतिरिक्त, नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. 12 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींना 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळणार आहे, त्यामुळे 12 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तींच्या एकूण 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कराची सूट मिळणार आहे. यामुळे नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता, 4 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागू होणार नाही, जे गेल्या वर्षी 3 लाखांपर्यंतच करमुक्त केले होते. मात्र, ही घोषणा नवीन आयकर प्रणालीनुसार कर भरणाऱ्यांनाच लागू होईल.
Union Budget 2025 : असा असेल नवीन कर
0 ते 12 लाखांपर्यंत – काहीच कर नाही
12 ते 16 लाखांपर्यंत – 15 टक्के आयकर लागणार
16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के आयकर लागणार
20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के आयकर लागणार
24 लाखांपेक्षा जास्त 30 टक्के आयकर लागणार
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय