3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल

हॅलो जनता, (पाचोरा) प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा – लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा आज पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात 3 हजार कोटींचा विकास केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कोणाचा, आणि कुठे -कुठे कसा विकास झाला.? हे जनता आता ओळखून आहे, असा टोलाही अमोल शिंदे यांनी लगावला आहे.
मागील निवडणुकीत मला छीचोरा मुलगा म्हणत 10 हजार मतांचे गणित याच आमदारांनी मांडले होते. येथील जनतेने मला 75 हजार मते मिळवून दिले, कारण माझ्याकडे सोन्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, तर गद्दाराकडे विकत घेतलेले ठेकेदार आहेत. या निवडणुकीत येथील जनता एक लाख मते माझ्या झोळीत टाकल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास अमोल शिंदे यांनी मेळाव्याला बोलताना व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर भाजपाचे पाचोरा – भडगाव विधानसभा क्षेत्र निरीक्षक व गांधीनगर चे उपमहापौर प्रेमसिंग गोल, भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश शिंदे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, भाजपा व्यापारी जिल्हाध्यक्ष रमेश शेठ वाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल बापू पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, भटक्या विमुक्त जाती जिल्हाध्यक्ष अरुणकाका पवार
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष परेश पाटील, तालुकाध्यक्ष करण पवार, छत्रपती ग्रुप चे जिल्हाध्यक्ष भूषण पाटील, सुधाकर अहिरे, दिवाकर वाघ, भाजपा शहराध्यक्ष दीपक माने, तालुका सरचिटणीस मुकेश पाटील, शहर सरचिटणीस जगदीश पाटील, संदीप बोरसे, योगेश माळी, शरद अण्णा पाटील, समाधान मुळे, योगेश चौधरी, दादाभाऊ बोरसे, एम. डी. पाटील, किरण पांडे, प्रवीण पाटील, ज्योतीताई भामरे, आदी गटप्रमुख, गणप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या…
Chimanrao Patil : पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन