विद्यापीठाच्या परिसर मुलाखतीत सात विद्यार्थ्यांची निवड, कुलगुरूंनी दिल्या शुभेच्छा…

हॅलो जनता, जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेतील सात विद्यार्थ्यांची परिसर मुलाखतीमध्ये निवड झाली असून कुलगुरू प्रा व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली.
विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाअंतर्गत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे बी. टेक केमिकल इंजिनिअरिंग च्या विद्यार्थ्यांसाठी कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लि. मुंबई व सुप्रीम पेट्रोकेम लि. रायगड या कंपन्यांतर्फे परिसर मुलाखतीचे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील सेमिनार हॉल येथे आयोजन करण्यात आले होते.
या परिसर मुलाखतीतून कुमार मेटल इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड, मुंबई या कंपनीत निकिता चौधरी आणि निकिता कोळी या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. तर सुप्रीम पेट्रोकेम. लिमिटेड, रायगड या कंपनीत प्रसाद ठाकूर, प्रशांत पाटील, राम साखरे आणि जयेश पाटील यांच्यासह प्लास्टिक टेक्नॉलॉजीच्या अमित कोळी अशा एकूण ७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
आज निवड झलेल्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली असून यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील,अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे, संस्थेचे संचालक प्रा. अजयगीरी गोस्वामी, कक्षाचे समन्वयक प्रा. उज्वल पाटील, प्रा.राजकुमार सिरसाम, प्लेसमेंट ऑफिसर सोनाली दायमा हे उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या….
पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित
निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”