⁠हॅलो संवाद

Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…

हॅलो जनता (जळगाव) – दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची (Annabhau Sathe Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळास चालू आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता ४०० लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातीतील व्यक्तींना अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

Annabhau Sathe Mahamandal : योजनेचा लाभ मिळण्यास या आहेत अटी…

– अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा.

– अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

– अर्जदार हा मातंग समाजातील १२ पोट जातीतील असावा.

– अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असणे आवश्यक,

– महामंडळाच्या योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी असावे.

– राज्य शासनाच्या योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे.

– अर्जदाराने महामंडळाकडून यापूर्वी व इतर कोणत्याही शासकीय उप- क्रमाकडून लाभ घेतलेला नसावा.

– एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळेल

जळगाव जिल्ह्यातील ज्या प्रशिक्षण संस्थेची कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणीकृत केलेल्या संस्था अशा प्रशिक्षण संस्थांकडून ३१ मेपर्यंत महामंडळाचे कार्यालयात प्रस्ताव दोन प्रतिमध्ये आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात सादर करावे. तसेच मातंग समाजातील होतकरू महिला, पुरुष, तरुण वर्गांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Annabhau Sathe Mahamandal : प्रशिक्षणाची निवड प्रशिक्षणार्थीने करावी

– अर्जदाराने आधारकार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशील सादर करावा

– प्रशिक्षणाची फी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने ठरवलेल्या दराने दिली जाईल.

– प्रशिक्षणाची निवड प्रक्षिणार्थीने करणे बंधनकारक राहील,

– प्रशिक्षण पोर्टलवर नोंदणीकृत केलेले असेल अशाच संस्थेने प्रस्ताव दाखल करावा.

– प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर परीक्षा देण्याची जबाबदारी संस्था चालकांची राहील.

– प्रशिक्षण संस्थेला प्रशिक्षण कालावधीनुसार टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण फी दिली जाईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला बचाव कार्य करत असताना आले वीरमरण, परिसरात शोककळा

Jalgaon : जिल्ह्यात बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंग द्वारे विक्री, ‘ या’ आमदाराने केली तक्रार…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button