Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..
हॅलो जनता (जळगाव) – नात्यात लग्न होत नसल्याने कुटुंबाने लग्नाला विरोध केल्याने चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील प्रेमीयुगुलाने चाळीसगांव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दि. ७ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास चाळीसगाव आणि वाघळी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाचा पाय कापला गेल्याने त्याच्यावर धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चाळीसगाव रेल्वे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
बोढरे येथील रिक्षाचालक सचिन गणपत चव्हाण (वय २२ वर्षे) याचे गावातील त्याच्याच जवळच्या नात्यातील एका १९ वर्षीय मुलीशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाचा विचारही केला होता. (Suicide) मात्र, ते एकच नात्यात असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. आपले लग्न होणार नसल्याने त्यांनी नैराश्यातून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
Suicide : नेमके काय घडले…
त्यानुसार गुरुवारी दि. ६ ला रात्री दोघांनी गावातून पलायन करत दोघांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून (Suicide) दिले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला तर सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यावर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या मोबाईलवरून गावी भावाला कळविले असता नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यानंतर जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या दुसऱ्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने बोढरे गावात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत…
इतर महत्त्वाच्या बातम्या…
What’s App : व्हाटसअॅप स्टेट्स ने चोरीला गेलेला बैल सापडला, सोशल मीडियाचा शेतकऱ्याला झाला फायदा
Weather update : महाराष्ट्रातील मान्सून सक्रिय, या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस…
Dhule : गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोन तरुणांवर गुन्हा दाखल