हॅलो राजकारण

Sanjay Raut : ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोरा दौऱ्यावर 

निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन

हॅलो जनता, पाचोरा – ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गुरुवारी, २२ ऑगस्ट जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव आणि पारोळा या मतदारसंघात त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील अटल मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पाचोरा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay Raut) यांचे भारत डेअरी येथे सकाळी ९ वाजता शहरात आगमन होणार आहे. तेथुन बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. बाईक रॅली जामनेर रोडमार्गे शिवसेना कार्यालयाजवळ येणार आहे. तेथे स्वागत व शिवध्वजारोहण होणार आहे.

शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे व प्रतिमांचे पूजन केल्यानंतर भुयारी मार्गे, भडगाव रोड, राजे संभाजी चौक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहरातील अटल मैदानावर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना संजय राऊत संबोधित करणार आहेत.

मेळाव्याला संपर्क प्रमुख संजय सावंत, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी व जिल्ह्यातील ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यात मतदार संघातील सर्व शिवसैनिक, शिवसेनेवर निष्ठा ठेवणाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी केले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button