हॅलो सामाजिक

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी

हॅलो जनता न्युज :

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता‎ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद‎ जयंती साजरी करण्यात आली.‎ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून‎ मा. नगरसेवक तथा संस्था अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक ,शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला मालार्पण झाल्यानंतर राजमाता जिजाऊ‎ जयंतीचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते उपक्रमशील उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांना राजमाता जिजाऊ‎ पुरस्काराने गौरवण्यात आले.

स्वामी विवेकानंदांच्या वेशभूषेत इयत्ता ४ थी चा सुयोग सूर्यकांत जगताप इयत्ता ४थी च्या जिजाऊ मातेच्या वेशभूषेत परी सोनार, सानवी कोठाडे व यामिनी भालेराव त्यांनी वेशभूषा केली होती. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थांनी‎ भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली.‎ कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता सानप यांनी केले. तर सूत्रसंचालन‎ सुवर्णा अंभोरे यांनी तर करिष्मा घुगे यांनी आभार मानले.‎ कार्यक्रमाला शितल कोळी, उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक, शारदा तडवी,‎ दिनेश पाटील व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी‎ उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button