Paldhi Violence : पाळधी गावात दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू ; सात जणांची अटक, 63 लाखांचे नुकसान
हॅलो जनता, न्युज : पाळधी
पाळधी (Paldhi Violence) गावात वर्षाच्या अखेरीस किरकोळ वादातून उसळलेल्या दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नववर्षाच्या सुरुवातीलाच जनजीवन विस्कळीत झाले आहे. पोलिसांनी दंगलप्रकरणी सात जणांना अटक केली असून, यासोबतच 11 दुकानांसह चार वाहने जाळली गेली, ज्यामुळे अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
दंगलीत जाळपोळ आणि दगडफेकीमुळे अनेक व्यवसायिकांना मोठे नुकसान झाले आहे. यासीर अमित देशमुख यांच्या मोबाईल दुकानात दीड लाख रुपयांचे मोबाईल चोरीला गेले. जावेद पथरू पिंजारी यांच्या चप्पल दुकानाला आग लागून आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. शेख हबीब शेख शरीफ यांचे पानसेंटर जाळून 2 लाख 30 हजार रुपयांचे नुकसान झाले. वकार अहमद शेख शकील यांच्या घरासमोरील दोन दुचाकी आणि घरावर दगडफेक करून पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.
तसेच, फारुक शेख शरीफ यांच्या बाजार पट्ट्यातील इलेक्ट्रिक दुकानाला आग लावून पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एजाज युसूफ देशमुख यांच्या मक्का शॉपिंग कॉम्प्लेक्समधील ऑटो पार्ट्स दुकान फोडून 3 लाख रुपयांचे सामान चोरून नेले. दानिश शेख सत्तार यांच्या रेफ्रिजरेटर दुकानाचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. शेख साबीर शेख सादिक यांच्या मोबाईल शॉप दुकानाचे शटर तोडून नवीन मोबाईल आणि एलसीडी यांची तोडफोड करून 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. अक्रम खान अन्वर खान यांच्या दुकानाला 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. रफिक खान अन्वर खान यांच्या आमलेट सेंटर हातगाडीचे नुकसान होत तीन हजार रुपयांचे नुकसान झाले.
Paldhi Violence : 63 लाखांचे नुकसान
राष्ट्रीय महामार्गाच्या बोगद्याजवळ शेख तसव्वर शेख हमीद यांच्या मालकीची चार वाहने जाळून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. एकूण नुकसान अंदाजे 63 लाख 28 हजार रुपयांवर पोहोचले आहे. या प्रकरणी जावेद पथरू पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाळधी पोलीस ठाण्यात 20 ते 25 अज्ञात लोकांविरुद्ध दंगल, तोडफोड आणि आग लावण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक पवनकुमार देसले तपास करत आहेत.
31 डिसेंबर रोजी रात्री सव्वा अकरा वाजता वाहनाच्या कटामुळे वाद सुरू झाला, जो पुढे दंगलीच्या रूपात वाढला. या वादात जमावाने रस्त्यावर बंद असलेल्या दुकानांना आणि चार वाहने जाळली, ज्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक