Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत
घर टु घर भेटीगाठी घेऊन नागरिकांचे घेत आहेत आशिर्वाद, आतापर्यंत सत्तर टक्के प्रचार पुर्णत्वास
हॅलो जनता, चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगावसह राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे उस्फुर्त स्वागत होत असून दारोदारी महिला भगिनी रांगोळ्या काढून आनंदाने स्वागत करत आहेत. प्रत्येक ठिकाणी औक्षण करून विजयासाठी आशिर्वाद मिळत असून आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के प्रचार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुर्ण केल्याचे दिसून येत आहे.
आ.मंगेशदादा चव्हाण (Mangesh Chavhan )हे शहरात प्रचार करत असतांनाच त्यांच्या पत्नी सौ.प्रतिभाताई चव्हाण यादेखील ग्रामीण भागात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाप्रमाणे अतिशय नियोजनबद्ध प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. आ.मंगेश चव्हाण यांची प्रचार यंत्रणा आणि सुक्ष्म नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे कमी वेळ असल्याने सर्व मतदारांपर्यंत कसं पोहोचता येईल या विचाराने राज्यातील बहुतेक उमेदवार विचारात पडलेले दिसत आहेत.पण चाळीसगाव मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण हे मात्र याबाबत निश्चिंत दिसून येत असून जनतेकडून देखील अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत आहे. त्यांच्यासोबत महायुतीतील सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि मित्रपरिवार देखील मोठ्या उत्साहाने प्रचारात उतरलेले दिसून येत आहेत.
Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत
माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा डॉ.अश्विन सोनवणेंनी घेतला आशीर्वाद !