Kolhapur : कोल्हापुरातील श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या खजिन्यात वाढ, मिळाली इतकी देणगी….
हॅलो जनता, कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील (Kolhapur) श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या खजिन्यात १ कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ इतक्या घसघशीत देणगीची भर पडली आहे. महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या १२ देणगी पेट्या असून देणगी पेट्यांमधील रकमेची चार दिवसांपासून सुरू असलेली मोजणी काल शुक्रवारी संपली.
मंदिरातील पहिल्या व दुसऱ्या पेटीत सर्वाधिक प्रत्येकी ४५ व ४६ लाखांची रक्कम जमा झाली आहे. यासह ७ क्रमांक आणि ११ क्रमांकाच्या पेटीत प्रत्येकी २५ आणि १९ लाखांवर रक्कम जमा झाली. सर्व देणगी पेट्यांतील रक्कम मिळून १ कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ रुपये एवढी रक्कम देवीच्या खजिन्यात जमा झाली आहे. दुसरीकडे दागिन्यांची संख्या जास्त असल्यानं देवीच्या गेल्या चार वर्षांतील दागिन्यांच्या मूल्यांकनाचं काम मध्येच थांबविण्यात आलं आहे.
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड, जळगावात समर्थकांकडून जल्लोष…
Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन