⁠हॅलो संवाद

Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…

हॅलो जनता (जळगाव) – असंख्य गोरगरिबांचेच नव्हे तर सर्वसामान्य आणि इतर सक्षम वर्गातीलही लाखो रुग्णांचे आशास्थान असलेल्या, राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने आरोग्यसेवेत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. आता कॅन्सर व डोळ्यांच्या पडद्यांच्या विकारांचे रुग्णांवरही याठिकाणी योजनेंतर्गत अल्पदरात मोफत उपचार व शस्रक्रिया सुविधेला प्रारंभ केला जात आहे.

या हॉस्पिटल मध्ये कॅन्सर (कर्करोग) विभाग तोंडाचा, स्तनाचा, गर्भाशयाचा, आतड्‌याचा कर्करोग इ. सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील शस्रक्रिया व उपचार करण्यात येतील. केमोथेरपीची सुविधा देखील उपलब्ध असून सुसज्ज ऑपरेशन थिएटर, अद्ययावत मशिनरी व तज कर्करोग सर्जन व फिजिशियन यांचे मार्गदर्शन रुग्णांना लाभणार आहे.

नेत्ररोग विभाग नेत्र व दृष्टिपटल (रेटिना) तपासणी व उपचार, डोळ्यांच्या पड‌द्याची (रेटिना) ग्रीन लेझर शस्रक्रिया, इन्ट्राव्हिट्रियल इंजेक्शनची सुविधा, डोळ्यांच्या पड‌द्याची (रेटिना) अत्याधुनिक बिनटाक्याची शस्त्रक्रिया, मार लागलेल्या डोळ्यांची तातडीने चिकित्सा व शस्त्रक्रिया इ. सर्व नेत्ररोगांचे निदान व उपचार तज्ञ नेत्ररोग सर्जन व फिजिशियन द्वारे केले जाणार आहेत.

Jalgaon : यांच्यावर केले जातील मोफत उपचार…..

तसेच महात्मा ज्योतिबा जनआरोग्य योजने अंतर्गत पात्र रुग्णांवर कॅन्सर व नेत्ररोग शस्त्रक्रिया व उपचार मोफत केले जातील. त्यामुळे कॅन्सर व नेत्ररोग असलेल्या रुग्णांनी अल्पदरात /मोफत उपचार व शस्रक्रिया सुविधेचा तसेच इतर आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे चेअरमन प्रकाश चौबे, व्हा. चेअरमन भालचंद्र पाटील व संचालक मंडळ आणि रुग्णालय प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button