Bhusawal Gangwar : भुसावळ शहर गँगवार ने हादरले, गोळीबारात दोघांचा मृत्यू

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी गँगवॉर (Bhusawal Gangwar) मध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असताना भुसावळ शहरात पुन्हा गँगवार सुरू झाला असून २९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भुसावळ शहारातील मरिमाता चौकात स्विफ्ट डिझायर गाडीमधून जळगाव कडे जात असताना अचानक अज्ञात दोन जणांना कडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही जण जागीच ठार झाले असून भुसावळ शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.
Bhusawal Gangwar : जुन्या वादातून झाला गोळीबार
मृतांमध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे व त्यांचे व्यवसायिक मित्र सुनील राखुंडे यांचा समावेश आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली असून संतोष बारसे यांचे वडील मोहन बारसे यांच्यावर देखील काही वर्षांपूर्वी गोळीबार झाला असून त्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या घटनेमुळे भुसावळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी