⁠हॅलो रोजगारहॅलो राजकारण

Khan sir : बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांची तब्येत अचानक बिघडली, जाणून घ्या नेमके काय घडले…

हॅलो जनता न्युज

बिहारचे लोकप्रिय शिक्षक आणि यूट्यूबर खान सर (Khan sir) सध्या आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खान सर बिहार मधील बीपीएससी परीक्षेतील नॉर्मलाइझेशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिहाइड्रेशन, ताप आणि खोकला झाला होता. त्यांना प्रभात मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सध्या त्यांची तब्येत स्थिर आहे आणि ते बरे होत आहेत. त्यांना ऑक्सिजन आणि ग्लूकोज दिला जात आहे. त्यांनी सांगितले की, डिहाइड्रेशन आणि थकव्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Khan sir : बिपीएसी परीक्षा संदर्भातील नेमका काय आहे वाद?

खान सर (Khan sir) पटनातल्या विरोध प्रदर्शनादरम्यान बीपीएससी उमेदवारांवर लाठीचार्ज झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांसोबत विरोध प्रदर्शन करत होते. असे म्हणतात की, त्यांना आणि काही प्रदर्शनकारी विद्यार्थ्यांना पटनाच्या विरोध स्थळावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि नंतर रात्री उशिरा सोडून दिले होते. तथापि, पोलिसांनी या अटकच्या बातम्यांचे खंडन केले होते. पोलिसांनी खान सरच्या कोचिंग संस्थे, खान ग्लोबल स्टडीजवर अटक करण्याबाबत एफआयआरही दाखल केली आहे.

खान सरांवर विरोध प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्या कोचिंग संस्थेवर छापा टाकला आहे.
सोशल मीडियावर खान सरच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त होत आहे. त्यांचे चाहते आणि विद्यार्थी त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत आहेत. खान सरांना स्पेशल केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना नेबुलाइझर, ऑक्सिजन आणि ग्लूकोज दिला जात आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांना लवकर डिस्चार्ज केले जाऊ शकते.

इतर महत्वाच्या बातम्या…

कृषि विज्ञान केंद्रात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

प्रयागराज कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, “या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन…

मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button