कवियत्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा
हॅलो जनता न्युज, जळगाव :
जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती आणि मां जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी व प्राचार्य संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन जैन फॅक्टरीचे उपाध्यक्ष व आय एम सी चेअरमन जितेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन व मां जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री पाटील होत्या, तर प्रास्ताविक नितीन चौधरी यांनी केले.
कार्यक्रमात जितेंद्र जैन आणि आय टी आय जळगावचे माजी प्रशिक्षणार्थी अजय पाटील यांनी युवक-युवतींना मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात शिल्पनिदेशक निलेश माने, आय टी आय प्रशिक्षणार्थी व एन एस एस स्वयंसेवक नम्रता नांदेडकर, भावेश चौधरी, आकांक्षा सुरवाडे यांनी उत्कृष्ठ भाषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदिप उगले यांनी केले, तर आभार चंद्रशेखर घोडके आणि रमेश सपकाळ यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन समितीचे सदस्य लोमेश धांडे, डी डी देवरे, शालीकराम बोरोले, विलास भोळे, विलास पाटील, किशोर शिरसाळे, वासुदेव सपकाळे, फारुक तडवी, नितीन पाटील, सौ. सुनिता भोसले आणि शिल्पनिदेशक कार्यालयीन कर्मचारी, एन एस एस स्वयंसेवक यांचे योगदान मोठे होते. संस्थेतील सर्व प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी
Journalist Day : एरंडोलमध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान