Journalist Day : एरंडोलमध्ये मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
हॅलो जनता न्युज :
एरंडोल – मराठी पत्रकार दिनाचे (Journalist Day) औचित्य साधून माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्यावतीने एरंडोल शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे होते. व्यासपीठावर कोल्हे यांच्यासह विशेष सत्कारार्थी व अतिथी एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मोहन शुक्ला, माजी तहसीलदार अरुण माळी, सामाजिक कार्यकर्ता कृष्णा भाऊ सोनार व एरंडोल तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, आल्हाद जोशी, रतिलाल पाटिल, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे एरंडोल तालुकाध्यक्ष सिताराम मराठे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम सरस्वती देवीच्या मूर्तीला व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व त्यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व शाल देऊन व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
जेष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना, पत्रकारिता करणे म्हणजे काटेरी मुकुट बाळगणे होय व हा काटेरी मुकुट घालून आपल्या बातमीतून सर्वांना न्याय देणे म्हणजेच खरी पत्रकारिता आहे. त्यामुळे निडरपणाने आपले कार्य सुरू ठेवावे असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.माजी तहसीलदार अरुण माळी यांनी हायवेवर नेहमी होणाऱ्या अपघाता विषयी पत्रकारांनी बातम्या देऊन ” राष्ट्रिय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचे काम चांगल्या रीतीने केले असे म्हणून सर्व पत्रकारांचा गौरव केला. ॲड. मोहन शुक्ला यांनी आपले विचार व्यक्त करतांना सर्व पत्रकारांना आश्वासित केले की कुठल्या बातमीने तुम्हास कायदेशीर अडचण आली तर मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. परंतु पत्रकारांनी सुद्धा बातमी देताना कायदेशीर अडचण येईल अशी बातमी प्रकाशित करू नये. हायवे वर होणाऱ्या अपघाताविषयी कुठल्या मार्गाने अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने जागे करता येईल त्याविषयी सविस्तर माहिती दिली. अखेरीस आपल्या अध्यक्षीय भाषणातून अमोल कोल्हे यांनी सर्व वक्त्यांनी केलेल्या भाषणांचा उहापोह केला. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली मराठी पत्रकारितेची सुरुवात केली तेव्हापासून आज पर्यंत पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहे, आपणही त्यानुसार बदलले पाहिजे . तसेच कोणत्याही पत्रकारासोबत एखादी अप्रिय घटना घडल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, पत्रकारिता व माहिती अधिकार या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यकर्त्यांनी एकत्र राहणे हि काळाची गरज आहे , असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी केले.
या कार्यक्रमात सत्करार्थी पाटील प्रा.सुधीर शिरसाठ , कमर अली सय्यद , कैलास महाजन , जावेद मुजावर , संजय चौधरी , प्रवीण महाजन , दिपक बाविस्कर , पंकज महाजन , शैलेश चौधरी , प्रमोद चौधरी , प्रकाश शिरोळे , कुंदन सिंग ठाकूर, उमेश महाजन, दिनेश चव्हाण, स्वप्नील बोरसे या पत्रकारांचा तसेच माहिती अधिकार माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे पाचोरा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, जळगाव जिल्हा सहसंघटक प्रकाश सपकाळे, चोपडा तालुकाध्यक्ष गुणवंतराव सोनवणे यांचा सन्मान चिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन भरत महाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता संभाजी पाटील, प्रा.आर. एस. निकुंभ, अरुण गुजर , मधुकर महाजन, राहुल महाजन, सुनील महाजन, अनंत सोनवणे, जगदीश पवार, राजधर महाजन , नितीन ठक्कर, विज्ञान पाटील, तुषार शिंपी,भरत महाले, सोपान माळी अरुण नेटके, प्रभाकर महाजन यांनी परिश्रम घेतले.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’