Jamner Crime : जामनेर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, पोलिसांचा धाक संपला…
हॅलो जनता, जामनेर : Jamner Crime
शहरात दिवसाढवळ्या चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरात सकाळीच चोरी झाली असून चोरट्यांनी तब्बल ६ लाखांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना बेस्ट बाजारजवळील नवकार प्लाझा परिसरात घडली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून सध्या पुढील तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, माजी नगरसेवक श्रीराम महाजन यांचे लहान चिरंजीव किरण महाजन यांच्या घरी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान ही धाडसी चोरी झाली. किरण महाजन आणि त्यांची पत्नी दोघेही शाळेच्या नोकरीसाठी बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी संधीचा फायदा घेतला.
चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला आणि घरातील रोख रक्कम तसेच ५० ग्रॅम सोनं लंपास केलं. चोरीपूर्वी चोरट्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडत अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने ही घटना घडवली. दुपारी किरण महाजन घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवलं.
घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तर फिंगरप्रिंट पथकाने तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध घेतला जात असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Jamner Crime : ही चोरी पूर्वनियोजित ?
घरात चोरीला गेलेली रक्कम ही अवघ्या दोन दिवसांपूर्वीच बँकेतून काढण्यात आली होती. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असावी, असा संशय पोलिसांना आहे. कोणीतरी घरावर बारीक लक्ष ठेवून चोरट्यांना माहिती पुरवली असावी, अशी शक्यता तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी या दृष्टीने तपासाची दिशा ठरवत परिसरातील सर्व शक्य माहिती जमा करण्यास सुरुवात केली आहे. चोरीच्या घटनेने महाजन कुटुंबीय हादरून गेले असून परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे.
Makarsankranti 2025 : “संक्रांतीच्या आधीच तीळ खरेदी करा; भाव गगनाला भिडणार!”
Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…