Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
किशोर सोनवणे हा रात्री कालिंका माता मंदिर परिसरातील हॉटेल भानु येथे जेवणासाठी गेला होता. त्याच्यावर पाळत ठेवत इतर तरुणांना संशयित आरोपींनी बोलावून घेतले. हॉटेलमध्ये किशोर सोनवणे याच्यावर रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी घटस्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, इतर मारेकरी फरार झाले आहेत.
Crime News : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…
जळगाव जिल्ह्यात सातत्याने गंभीर गुन्हे घडत असल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.