Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…
हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime
दिवसेंदिवस कुटुंबांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे रागवणे, गैरसमज, तसेच सोशल मीडियावरील ओळखी यांसारख्या कारणांमुळे मुलींच्या पलायनाच्या घटना वाढत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३०४ मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी १०६ मुलींचा शोध लागला आहे. या प्रकरणांमध्ये, काही मुलींनी वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर विवाह केल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन मुलींना पालकांच्या ताब्यात दिले जाते; मात्र, पालकांसोबत जाण्यास नकार देणाऱ्या मुलींना बालकल्याण समितीमार्फत निरीक्षणगृहात दाखल करण्यात येते.
जिल्ह्यात बेपत्ता होणाऱ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे, ज्यामुळे पोलिस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे नोंदवले जातात. मुलींसोबतच मुलांच्या पलायनाच्या घटनाही घडत आहेत. पालकांना न सांगता पलायन करणाऱ्या मुलांच्या प्रकरणांमध्ये देखील पोलिसांत अपहरण किंवा हरविल्याची नोंद होते.
Jalgaon Crime : कमी वयातच मुलीला लग्नाचे आमिष
जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत मुले व मुली मिळून ३४७ जण बेपत्ता झालेले आहेत. त्यापैकी ३०४ मुली असून, ४३ मुलांचा समावेश आहे. कमी वयातच मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले जाते.
अनेक प्रकरणांत मुलगाही अल्पवयीन
बेपत्ता होणाऱ्या मुला-मुलींचे प्रमाण पाहिले तर मुली अल्पवयीन राहतात. त्यांना १८ वर्षांवरील मुले लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेतात. अनेक प्रकरणांत मुलेही अल्पवयीन असतात.
अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर
बेपत्ता झालेल्या मुली सापडल्या तर पालकांच्या स्वाधीन केल्या जातात. ज्या मुलींनी १८ वर्षे पूर्ण केले आहे, त्या मुली स्वतःच निर्णय घेतात. अनेक प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जातो.
कारणे काय?
बहुतांश प्रकरणात प्रेम प्रकरणातून मुलींनी पलायन केलेले आहे. काही प्रकरणात मुली आमिषाला बळी पडलेल्या आहेत. मोजक्याच प्रकरणात मुली खरोखरच मिसिग झालेल्या असतात. शक्यतो या मुलींचा शोध लागतोच. फरक फक्त कधी लगेच लागतो तर कधी उशीर होतो. काही मुलींनी तर लग्न करून संसार थाटल्याचे तपासात समोर आले आहे.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुला- मुलींना पुरेसा वेळ देण्यासह त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास ते कोणाच्या तरी सान्निध्यात येतात व ते पलायन करतात. त्यामुळे दररोज घरात मुलांशी संवाद साधून त्यांना वेळ दिला पाहिजे.
कृषी विभागाची मोठी कारवाई, ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान टळले…..
साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी