Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रक आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच भाजपचे युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावळे घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी तात्काळ वैद्यकीय मदत मिळवून देत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांनी दाखवलेले अपघातग्रस्ताचे प्राण वाचले असून त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
Jalgaon Loksabha : जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जाहीर पाठींबा