हॅलो राजकारण
Jalgaon : मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री आज जळगावात !
हॅलो जनता न्युज, जळगाव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गुरुवारी सायंकाळी जळगावात (Jalgaon) दाखल होणार आहेत. या दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम बुधवारी सायंकाळपर्यंत प्रशासनाला प्राप्त झाला नव्हता.
खासदार स्मिता वाघ यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हे मान्यवर जळगावात येत असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिस प्रशासनाने या मंत्र्यांसाठी वाहनांची व्यवस्था करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय सावकारे, चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल आणि दादा भुसे यांचाही जळगाव दौरा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.