Jalgaon : जळगाव येथील भाऊंचे उद्यान येथे “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन…
हॅलो जनता न्युज, जळगाव
जळगाव (Jalgaon) येथील भाऊंचे उद्यान येथे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एस. एस. राणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा ग्रंथालयांचे अधिकारी सुहास रोकडे यांच्या शुभहस्ते ई. डी. चौधरी यांनी लिहिलेल्या “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या सुरवातीला जळगाव (Jalgaon) इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट ॲंड सोशल सर्व्हिसेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील, उपाध्यक्ष एम. एन. महाजन, संचालक संजीव पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. तदनंतर जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. दीपक पाटील, पुस्तक लेखक ई. डी. चौधरी, संस्था अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील , ग्रंथालय अधिकारी सुहास रोकडे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एम.एस.राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचे लेखक ई. डी. चौधरी, पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांउटन सौ. सायली पाटील, सुर्यकांत पाटील, सुदाम पाटील, महेंद्र पाटील, अरुण हडपे, सौ. सरोज बडगुजर यांनी अथक परिश्रम घेतले.
ITBP Recruitment 2024 – 25 : 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी सुवर्णसंधी: ITBP मध्ये भरती प्रक्रिया सुरू