हॅलो राजकारण
Imtiyaz Jaleel : एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील करणार करण पवारांचा प्रचार
हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा मतदारसंघ प्रचाराला सुरुवात झाली असून हा विकास आघाडी आणि महायुती मध्ये चांगली चुरस पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत असून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारासाठी जळगाव सभा घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील हे भाजपचे खासदार, आमदार असूनही आमची चांगली मैत्री होती. तिकीट कापल्यानंतर मी उन्मेषला फोन करून सांगितले की, तुझा उद्या काहीही निर्णय असला तरी मी तुला मदत करायला तयार आहे. अगदी तुझ्या प्रचाचालाही येऊ शकेल, असे वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी एका पत्रकार परिषदेत केले.