धक्कादायक ! माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले
हॅलो जनता न्युज, दिल्ली :
दिल्लीतील श्रद्धा वाकर मर्डर केसने देशभरात धक्का दिला होता. आता तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एक शॉकिंग प्रकरण समोर आले आहे. एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून नंतर नदीत फेकले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सध्या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे, 35 वर्षीय महिलेच्या हत्येच्या संशयावरून तिच्या पतीला अटक करण्यात आली होती. चौकशीमध्ये त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने सांगितले की, पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून नंतर ते नदीत फेकले. पत्नीशी झालेल्या भांडणामुळेच त्याने हे क्रूर कृत्य केले असल्याचा पोलिसांचा संशय आहे. अधिक तपासानंतर संपूर्ण सत्य समोर येईल.
मृत महिला एक आठवडा पूर्वी बेपत्ता झाली होती आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव गुरु मुर्ती आहे. सध्या तो कंचनबाग येथील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो, आणि तो सेवानिवृत्त सैन्य कर्मचारी आहे. त्याचे वेंकट माधवीसोबत 13 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलं आहेत. आठवड्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह शिजवून नंतर नदीत फेकला, हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
कवयित्री बहिणाबाई शासकीय संस्थेत नेताजी व बाळासाहेब यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न !
Mumbai Crime : छोटा राजनचा राईट हॅन्ड डी.के. रावला अटक, खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांची कारवाई
एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न