पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा, वैशाली सुर्यवंशी मागणी…

हॅलो जनता न्युज (पाचोरा)
शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही कापसाला सोयाबीनला भाव मिळत नाही पुरेशी वीज मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही मग आमचा शेतकरी कसा जगेल आज त्याची अवस्था फार बिकट आहे त्याची शेती पिकेना सी झाली उत्पादन खर्च भरपूर वाढला अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जेव्हा आमचा शेतकरी पूर्णतः खचून जातो तेव्हा हे सरकार फक्त पंचनामाचे नाटक करते असे उद्गार आज वैशालीताई सूर्यवंशी यांनी काढले. त्या आदर्श कृषी सेवा केंद्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या.
पाचोऱ्याचे थोर सुपुत्र श्रद्धेय तात्यासाहेब आर.ओ. पाटील व त्यांचे स्नेही स्व. आबासाहेब पाटील यांनी रोवलेल्या आदर्श कृषी सेवा केंद्राच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून याचे औचित्य साधून आज माता कैलादेवी मंदिराच्या परिसरातल्या सावा मैदानावर आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेना-उबाठा पक्षाचे नेते तथा प्रख्यात वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या ओजस्वी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमांना वंदन करण्यात आले. यानंतर आदर्श कृषी सेवा केंद्र तसेच निर्मल सीडस परिवाराच्या वतीने प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वैशाली सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून भयमुक्त समग्र विकासाचे व्हिजन मांडले. त्या म्हणाल्या की, तात्यासाहेबांचे विचार व संस्कार मी पुढे घेऊन जातांना टक्केवारी, भ्रष्टाचार, दडपशाही यांना जरा देखील थारा देणार नाही. मतदारसंघाचा समग्र विकास करण्यासाठी मी कटिबध्द असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले. तर, आमदारांनी कामांचा लेखा-जोखा मांडतांना केलेले दावे हे खोटे असून जनतेची दिशाभूल करणारे असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. यानंतर मेळाव्याला नितीन बानगुडे पाटील यांनी संबोधित केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
Nivdnuk Aayog : अति उत्साही कार्यकर्त्यांनो सावधान ! अन्यथा होणार गुन्हा दाखल