रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

हॅलो जनता प्रतिनिधी – रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर काल मुंबई विमानतळावर पाचोरा व अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रात्री त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले आहेत. रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी, जिशान अशफाक पिंजारी यांच्यावर अमळनेर येथे तर हर्षल अनंतराव देसले याच्यावर भडगाव तालुक्यातील वाक् या गावी […]

सविस्तर वाचा

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता (जळगाव) – नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ व्यापक स्वरूपात व्हावी, यात सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाने प्रत्यक्षरित्या पाणी बचत करावी. तरच पुढील पिढ्यांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल, अन्यथा भविष्यात आणखी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती […]

सविस्तर वाचा

अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…

हॅलो जनता (अमळनेर) – तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथेआयोजीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील शिरुड या गावी कल्याणी पाटील यांनी जलसंधारण आणि गावाचा शस्वत विकास, हर घर तिरंगा मोहीम यासह इतर उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविल्या मुळे २५ फेब्रुवारीला […]

सविस्तर वाचा

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

हॅलो जनता (जळगाव) – शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांचे अपघात होत आहेत. त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी खड्ड्यांची पूजा करत त्यांना फुल हार […]

सविस्तर वाचा

पर्यावरण दिनानिमित्त एन.एस.एस व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत २ हजार सीड बॉल चे रोपण….

हॅलो जनता (जळगाव) – औद्योगीक प्रशिक्षण संस्था जळगाव व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पर्यावरण दिनानिमित्त २ हजार सीडबॉल चे रोपण करण्यात आले. महत्वाचे म्हणजे हे सीडबॉल स्वतः राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी बनवले होते. तसेच वृक्षरोपण व वृक्ष लागवडीसाठी खड्डे पण खोदण्यात आले. हरित शहर सुंदर शहर हे बोधवाक्य घेऊन यावर्षी जास्तीत जास्त वृक्ष रोपण करण्याचा स्वयंसेवकांना […]

सविस्तर वाचा

Dharangaon : धरणगाव शहरात पाणी टंचाई, ठाकरेंच्या सेनेचे नगरपालिका प्रशासनसमोर ठिय्या आंदोलन

हॅलो जनता (जळगाव) – धरणगाव (Dharangaon) शहरात सध्या भीषण पाणी टंचाई सुरू असून यासाठी कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करून नागरिकांना नियमीत शुध्द पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेतर्फे धरणगाव नगरपालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. धरणगाव शहरामध्ये पाणी टंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या अनुषंगाने आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नगरपालिका नागरिकांशी संवाद साधत […]

सविस्तर वाचा

Mount Everest : या ठरल्या माऊंट एवरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी

हॅलो जनता (नाशिक) – 50 वर्षीय द्वारका यांनी माऊंट एव्हरेस्ट (Mount Everest )सर करण्याचा विक्रम केला आहे. त्या महाराष्ट्र पोलीस दलातील त्या पहिल्याच महिला ठरल्या आहेत. त्यांच्या विक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या धाडसाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने वयाच्या 50 व्या […]

सविस्तर वाचा

Ramdevvadi Accident: रामदेववाडी प्रकरणात अजून आरोपी असल्याचा एकनाथ खडसेंचा दावा, पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी अपघात (Ramdevvadi Accident) प्रकरणात आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेत आरोपीचा शोध घेवून कठोर शिक्षा करावी, रामदेववाडी अपघात प्रकरणात निपक्षपणे चौकशी व्हावी, या गुन्ह्यातील अधिक आरोपी निष्पन्न करावे या गुन्ह्यात तपासात ज्या त्रुटी आहेत त्या तपासून हलगर्जीपना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा […]

सविस्तर वाचा

Jalgaon : धक्कादायक ! वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार तर मोठा मुलगा थोडक्यात बचावला…

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वार्‍यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना घडली आहे. तर या कुटुंबातील मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात वाचला आहे. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी येथे वादळात रात्री घर कोसळून चौघे जागीच […]

सविस्तर वाचा

Jalgaon : म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेता वर धडक कारवाई

हॅलो जनता (जळगाव) Jalgaon  कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा ,विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाईकामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव […]

सविस्तर वाचा