हॅलो सामाजिक

Burning Car : उभ्या कारने घेतला पेट, सोडा प्यायला थांबले अन् थोडक्यात बचावले

हॅलो जनता न्युज, जळगाव (burning car)

मुंबई नागपूर महामार्गावर जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्यानजीक उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या एका कारने (burning car) अचानक पेट घेतल्याने ती पूर्णपणे जळाली. कारमधील दोघेजण सोडा पिण्यासाठी खाली उतरले आणि त्याच वेळी कारने पेट घेतला. त्यामुळे सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.

विकास शांताराम नूरकर व ज्ञानदेव नारायण कठोरकर (दोघे रा. चारठाणा) हे कारने (एमएच ०६, बीएम ७०९९) जात असताना तरसोद फाट्याजवळ बांधकाम सुरू असलेल्या नवीन पुलाच्या खाली ते थांबले. सोडा पिण्यासाठी ते खाली उतरले आणि काही वेळातच कारने (burning car) पेट घेतला.

काहींनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मनपाच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला व (burning car) आग विझविण्यात आली. कर्मचारी देविदास सुरवाडे, भगवान पाटील, इकबाल तडवी, महेश पाटील, मनोज पाटील यांनी आग विझविली.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button