Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा
हॅलो जनता न्युज, बीड :
बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात सीबीआयने वाल्मीक कराड याला अटक केली असून, त्याला कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले.
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, “सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. आम्हाला न्याय हवा आहे. वाल्मीक कराडला अटक झाली आहे, पण आता मोठ्या मासळीची वाट पाहत आहोत. जर आरोपींना लवकरच अटक झाली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू.”
Beed : तर आम्ही महाराष्ट्र बंद करू..
जरांगे पाटील यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या नावाबाबतही चर्चा केली. ते म्हणाले, “चौकशी सुरू आहे, संबंधित व्यक्तींचे या प्रकरणाशी संबंध आहेत की नाही, ते सिद्ध होईलच. मात्र, जर दोषींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देतो.”
Weather Update : जळगाव, धुळेसह या जिल्ह्यात 3 जानेवारीपासून थंडीचा कडाका वाढणार
Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान