Accident : “भरधाव दुचाकीची धडक: जिल्हा परिषदेच्या लेखाधिकारी यांची प्रकृती गंभीर”
हॅलो जनता, न्युज, जळगाव : Accident
दुचाकीस्वाराने गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील लेखाधिकारी दिलीप काशिनाथ वानखेडे (वय ५४, रा. खोटेनगर) यांना जोरदार धडक (Accident ) दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दिलीप वानखेडे दुपारी सुमारे पावणेदोन वाजता शासकीय वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. जेवणासाठी डबा नसल्याने त्यांनी महाराष्ट्र बँकेजवळील पराठा सेंटरवरून पराठे आणण्यासाठी पोलिस निरीक्षकांच्या निवासस्थानाजवळ वाहन थांबवले. रस्ता ओलांडत असताना क्रीडा संकुलाकडून भरधाव वेगाने व राँग साइडने आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या धडकेमुळे ते हवेत फेकले गेले आणि जोरात खाली पडले.
यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना बालगंधर्व खुले नाट्यगृहाजवळील मल्टीस्पेशालिटी खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांच्या डोक्यात रक्तस्त्राव झाला असून रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून ते बेशुद्ध आहेत.
Fraud : “स्टील सप्लायच्या नावाखाली ४० लाखांची फसवणूक: भुसावळच्या ठेकेदाराची मोठी फसगत”
Raver Crime : जानोरी जंगलात सावदा पोलिसांची धडक कारवाई: चार गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त