हॅलो राजकारण

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

हॅलो जनता, प्रतिनिधी – ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्त विद्यापीठास शासनाची अमळनेर येथील 2 एकर जागा गट नंबर 376/1 येथे विद्यापीठास उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन उद्या सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता येथे मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

सदर कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुख्य उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि संबंधित अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे हे असणार आहे, अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, विभागीय संचालक डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.

सदर उपकेंद्रामुळे खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व २५० च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ या विद्यार्थ्यांना होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

Jalgaon : इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

Jalgaon : जळगाव जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था, मनसे आक्रमक

Patrkara Sanvada Yatra : पत्रकारांना सुद्धा आता मतांची ताकद दाखवावी लागेल – वसंत मुंडे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button