जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाची बातमी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..
हॅलो जनता, जळगाव – शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या ५९२.०१ कोटी किंमंतीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. तसेच प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. २७ जून २०२३ रोजी ‘शासन आपल्या दारी’ झालेल्या कार्यक्रमातील वचनाची मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेत.
पाटील यांच्या निर्देशानुसार तापी विकास महामंडळाने मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. यावल तालुक्यातील बहुतांश क्षेत्र सीजीडब्ल्युबी अहवालानुसार भुजल वापर दृष्ट्या डार्क झोनमध्ये येते. तसेच शेळगाव बॅरेजच्या जलाशयापासून १६ किलोमीटर दूर व १०० मीटर उंचीवरील यावल तालुक्यातील अधिसूचित क्षेत्राला शेतकरी वैयक्तिकरित्या पाणी उपसा करू शकत नव्हते. शेळगाव बॅरेजवर आतापर्यंत ९०० कोटींचा खर्च व पाणी उपलब्ध असून सद्धा केवळ यावल उपसा सिंचन योजनेसमंजुरी नसल्यामुळे आपले क्षेत्र ओलिताखाली आणता येत नव्हते.
मात्र सदर उपसा सिंचन प्रकल्पास मंजुरी मिळाल्याने बॅरेजमधील विना वापर पाण्यामुळे तालुक्यातील १९ गावांतील ९१२८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यातील साकळी, नावरे, विरावली, महेलखेडी, कोरपावली, दहिगा, वाघोदे, चुंचाळे, गिरडगाव, वढोदे, दगडी, बोराळे, शिरसाट, यावल शहर, सांगवी बु. चितोडे, अट्रावल, सातोद, कोळवद या गावातील कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. सदर प्रकल्पामुळे प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
शेती समाजाचा कणा असून महायुती शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रकल्पांचा लाभ जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला होईल. तसेच जळगाव, यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. भविष्यातही याच प्रकारे विविध प्रकल्पांना निधीची कमतरता पडू देणार नाही.
– गुलाबराव पाटील – पालकमंत्री, जळगाव
इतर महत्त्वाच्या बातम्या….
Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड, जळगावात समर्थकांकडून जल्लोष…
Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन