Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन
हॅलो जनता प्रतिनिधी – (Jalgaon) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक 197/2/2 आहे. त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी जमिनीचा हिसा मंजूर केला आहे. मात्र शिंदेच्या सेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींना स्थगिती दिली आहे.
त्यामुळे त्यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे आणि त्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत एक शेतकरी महिला म्हणून आपल्यावर अन्याय केल्याचा आरोपही अत्तरदे दांपत्याने केला आहे.
जिल्ह्यातील प्रमुख नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांकडे यासंदर्भात तक्रार केली असून देखील त्याची दखल घेतली जात नसल्याने सत्ताधारी पक्षाविरोधात सत्तेतील लोकांना आंदोलन करावा लागत असल्याचे देखील चंद्रशेखर अत्तरदे म्हणाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने देखील भाजपच्या या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळत आहे.
Muktainagar : पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक