श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय मार्फत मार्गदर्शन
हॅलो जनता, प्रतिनिधी – राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप प्रतिरोध महिना जून महिन्यात साजरा केला जातो. या अनुषंगाने हिवताप व इतर किटकजन्य आजाराविषयी शाळेतील विद्यार्थ्या मध्ये जागृती निर्माण व्हावी, यासाठी जनजागरण मोहिमेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या जनजागरण मोहिमेमध्ये शालेय पातळीवर हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधाच्या विविध उपाय- योजनांची माहिती विविध माध्यमाद्वारे पोचविणे आवश्यक आहे. डासोत्पती प्रतिबंध उपाय योजनांमध्ये सहभाग वाढविणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये जलद ताप रुग्ण सर्व्हेक्षण, डासोत्पत्ती स्थानांत गप्पीमासे सोडणे, सर्व्हेक्षण, चित्रकला स्पर्धा, हस्त पत्रिका वाटप व एक दिवस कोरडा दिवस पाळणे या विषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली जाईल. प्रत्येकाने आप-आपल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवावेत.
घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळी बसविणे, संडासच्या व्हॅट पाईपला जाळी बसविणे, झोपताना ओडोमॉसचा वापर करावा. कुलर्समधील पाणी आठ दिवसाला स्वच्छ करावे, घरासमोर डबकी होऊ देऊ नये, नारळपाण्याच्या करवंट्या तसेच घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, आपल्या जवळील परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील कोणत्याही व्यक्तीस ताप आल्यास तत्काळ जवळच्या शासकीय रूग्णालयात तपासणीस आणावे. तसेच घराबाहेर निघताना मास्क, ग्लोज व सॅनिटायझरचा वापर करावा, दोन व्यक्ती बोलताना त्यांच्यातील अंतर किमान एक मीटरचे असावेत, अशा सूचना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच आरोग्य निरीक्षक , डॉ. के. बी .नगराळे डॉ. ऐ. पी. सपकाळे, आरोग्य सेवक राहुल लाडवंजारी, रवींद्र पवार, कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. तसेच शिक्षक शिक्षकत्तर कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर विधानसभेच्या निवडणुकीत एकत्र येणार?, या नेत्याने केले वक्तव्य