आंचळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.


हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेड अंतर्गत आंचळगाव येथे आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपरखेडच्या वतीने स्वतंत्र आरोग्य पथक तयार करण्यात आले होते. शिबिरात गावातील नागरिकांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब (बीपी), हिमोग्लोबिन (एचबी), लिपिड प्रोफाइल आदी तपासण्या करून गरजेनुसार औषधोपचार करण्यात आले. नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. तसेच “अॅनिमिया मुक्त भारत” मोहिमेअंतर्गत रक्तक्षय (अॅनिमिया) आढळून आलेल्या नागरिकांना फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. महिलांमध्ये व तरुणींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने ही मोहिम अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी आंचळगावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, आरोग्य उपकेंद्र पिंपरखेड व आरोग्य उपकेंद्र आमडदे येथील सर्व अधिकारी व कर्मचारी, महालॅबचे कर्मचारी, आंचळगाव येथील सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते. गावातील ग्रामस्थांनीही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने अशा प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨अमळनेर ब्रेकिंग : मंत्रिपदाच्या वल्गना करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करा – माजी आमदार शिरीष चौधरी
जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…
जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ मध्ये अश्फाक खाटीक यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा



