Jalgaon Loksabha : जळगावात महायुतीला मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा चाळीसगावात ठाकरेंच्या सेनेत प्रवेश
हॅलो जनता (चाळीसगाव) – भारतीय जनता पार्टी कडून सातत्याने अब की बार चारशे पार अशी घोषणा दिली जात असली तरी महाविकास आघाड्यांच्या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आता कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असून देशासाठी (Jalgaon Loksabha) नाही तर माझ्या खान्देशसाठी ही स्वाभिमानाची लढाई कार्यकर्त्यांकडून लढली जाणार असल्याने अब की बार करन पवार हा निश्चय कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केले आहे.
Jalgaon Loksabha : चाळीसगावात यांनी केला प्रवेश
चाळीसगाव येथे वैभव मंगल कार्यालयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुक्याभरातून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळी बघावयास मिळाली तालुक्यातून ग्रामपंचायत सदस्य, विका सोसायटी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी यांनी शिवसेनेत प्रवेश करीत उन्मेशदादा पाटील व मान्यवरांच्या हस्ते शिवबंधन बांधून उबाठामध्ये प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत ,लोकसभा समन्वयक गुलाबराव वाघ, सह संपर्क प्रमूख सुनिल पाटील, उपजिल्हाप्रमुख ऍड.आर एल नाना पाटील, तालुकाप्रमुख रमेशआबा चव्हाण, तालुका निरीक्षक ऍड.अभय पाटील, लोकसभा समन्वयक महेंद्रबापू पाटील, शहराध्यक्ष नानाभाऊ कुमावत, विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमरावनाना खलाणे, माजी नगरसेवक नंदूभाऊ बाविस्कर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.