पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने पाचोरा तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा…
राहुलकुमार पवार सध्या चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशन येथे कार्यरत होते. २००६ साली पोलिस खात्यात सेवा सुरू केली. त्यानंतर त्यांनी राज्यभरात विविध ठिकाणी काम करत आपल्या कार्यशैलीची ठसा उमठवला आहे. अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), विशेष तपास पथक (एसआयडी), तसेच धुळे जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील त्यांचे मूळगाव असून, त्यांनी एम.एस्सी. (कृषी) या विषयात उच्चशिक्षण घेतले आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी आणि प्रशासनिक अनुभव यांचा उत्तम समन्वय त्यांच्या नेतृत्वात दिसून येतो. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लागला असून, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे कार्य त्यांनी याआधीही केले आहे.
पत्रकार गजानन गिरी यांनी पोलिस निरीक्षकांची भेट घेत केले स्वागत
पाचोर्याचे वरिष्ठ पत्रकार गजानन गिरी यांनी पाचोरा पोलीस स्थानकात नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना शुभेच्छा देत गेल्या काही दिवसांपासून पाचोरा तालुक्यात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाली आहे. आगामी काळात गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी तसेच जनतेशी सकारात्मक संवाद ठेवण्यासाठी पवार यांचे योगदान मोलाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…
💥 ब्रेकिंग : रोहिणी खडसेंची ‘त्या’ महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार, न्यायालयात दाद मागणार.
रोहित निकम यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..