पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरात आज सायंकाळी एक धक्कादायक आणि भीषण घटना घडली. शहरातील बसस्थानक परिसरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात आकाश मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानक परिसरात घडली. आकाश मोरे हा बसस्थानकाजवळ उभा असताना, दोन तरुणांनी त्याच्यावर अचानकपणे गोळीबार केला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश सोनवणे आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका तरुणाने ही फायरिंग केल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पोलीस पथके आरोपींच्या शोधार्थ रवाना झाली असून, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक देखील सक्रिय झाले आहे.
गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार हे वैयक्तिक वादातून घडले असावे, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
विद्यार्थ्यांनो! १२ वी कॉमर्स नंतर काय? हा कोर्स करा आणि हमखास नोकरी मिळवा…
💥 पाचोरा गोळीबार : ११ राऊंड फायर, नेमके काय घडले….
💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी