हॅलो सामाजिक

ब्रेकिंग : छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव (93 किमी) रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाला मंजुरी…

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव 

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव – बीड – छत्रपती संभाजीनगर (240 किमी) आणि छत्रपती संभाजीनगर – चाळीसगाव (93 किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांसाठी अंतिम स्थान सर्वेक्षणास मंजुरी देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ₹8.32 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर (240 किमी) – ₹6 कोटी तर छत्रपती संभाजीनगर-चाळीसगाव (93 किमी) – ₹2.32 कोटी रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणासाठी मंजूर करण्यात आले आहेत.

ही रेल्वे मार्गिका मराठवाडा व खान्देशच्या दळणवळणाच्या सोयींमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती देईल. तसेच मराठवाडा व खान्देशच्या प्रगतीसाठी हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर या रेल्वेमार्गाच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल असून राज्य शासनातर्फे देखील यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. सदर स्थान सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहेत…

इतर महत्वाच्या बातम्या….

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने झोपेतच चिरडलेल्या तिघां मजुरांची ओळख पटली…

ब्रेकिंग : राज्यातील ३० टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार, हे आहे कारण….

जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button