ब्रेकिंग : राज्यातील ३० टक्के कुटुंबाचे स्वस्त धान्य बंद होणार, हे आहे कारण….

हॅलो जनता न्युज
स्वस्त धान्याच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मागील सहा महिन्यांपासून पुरवठा विभाग त्यावर काम करीत असले तरी ३० टक्के लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा धान्य पुरवठा बंद करण्याची ताकीद देण्यात आली आहे. राज्यात पुणे जिल्हा तर अगदी तळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.वारंवार अंतिम मुदत, तारखा देऊनही राज्यभरात केवायसीचे काम सहा महिन्यांत ७० टक्क्यांवर आहे. यात ठाणे, भंडारा, वर्धा आघाडीवर असून, पुणे जिल्ह्यात मात्र राज्यात सर्वात कमी ५४.४२ टक्के काम झाले आहे.
ई – केवायसी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा 👇
जळगाव जिल्ह्यासह कोणता जिल्हा किती टक्क्यांनी मागे?
पुणे ४६.५८, परभणी ३९.८३, बीड ३८.०८, नागपूर ३७.८७, नांदेड ३७.३३, धुळे ३६.८९, धाराशिव ३६.४४, जळगाव ३६.०४, नंदुरबार ३५.३८, लातूर ३५.०४, हिंगोली ३४.५८, सिंधुदुर्ग ३४.१९
ही आहे अंतिम मुदत…
ई-केवायसीसाठी प्रारंभी १ नोव्हेंबर २०२४ ची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा तीन ते चार वेळा मुदवाढ दिली असून, आता १५ मार्च अंतिम तारीख आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. तसे न केल्यास संबंधितांना धान्य वितरण सेवेचा लाभ मिळणार नाही.
कशी कराल ई-केवायसी ?
अजूनही रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर, परिसरातील कोणत्याही स्वस्त धान्य दुकानात जाऊन फोर-जी ई-पॉस मशीनने करून घेऊ शकता.
इतर महत्वाच्या बातम्या
जिल्हा कृषी औद्योगिक संस्थेची निवडणुक बिनविरोध, रोहित निकम यांचे नेतृत्व सिद्ध
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेत खांदेपालट, नवीन चेहऱ्यांना संधी….
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…