हॅलो सामाजिक

तीन दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक, रेल्वेच्या वाहतुकीवर “असा” होईल परिणाम…

हॅलो जनता, भुसावळ प्रतिनिधी –

भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव आणि भादली रेल्वे स्थानका दरम्यान तीन दिवस विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. आजपासून सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत हा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक आजपासून लागू करण्यात आला आहे. १ मार्च पासून ३ मार्च पर्यंत हा पावर ब्लॉक राहणार असून प्रवाशांनी आपल्या प्रवास करताना ही बाब लक्षात घ्यावी असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.

भुसावळ विभागात जळगाव – भादली स्थानकांदरम्यान चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. सदर उड्डाणपूल तरसोद-फागणे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत अंतर्गत बांधला जात असल्याने भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला असून आजपासून या ब्लॉकचा परिणाम रेल्वे च्या वाहतुकीवर होणार आहे.या ब्लॉकमुळे अनेक रेल्वे गाड्या तासाभराने उशिरा धावणार आहेत तर काही गाड्या या भुसावळ स्थानकावरून उशिराने सुटणार आहेत.

दिनांक ०१.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक – 

१) गाडी क्रमांक १२५२० अगरतला -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ०१.१५ तास रेगुलेट करण्यात येईल.

२) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

३) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

४) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०२.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक – 

१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

२) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

३) गाडी क्रमांक १२७४२ पटना -वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

दिनांक ०३.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक – 

१) गाडी क्रमांक २२१२२ लखनौ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

४) गाडी क्रमांक २२३११ भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.

४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.

इतर महत्वाच्या बातम्या…

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button