गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
विद्यार्थ्यांनी 328 विज्ञान प्रकल्पाचे केले सादरीकरण

गजानन गिरी (विशेष प्रतिनिधी) पाचोरा –
आज दि. 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे अनिल भाई दुलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेम शामनानी, अनिल भाई दुलानी, राम केसवानी, हरी भाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी, सुरेश दुलानी, शाळेतील शिक्षक वृंद यांच्यासह भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते.
या प्रदर्शनात तिसरी ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनात भाग घेत तब्बल 328 विविध विज्ञानासंबंधित विषयांवर आधारित प्रकल्प तयार केले होते. यात प्रामुख्याने पाणी बचत, पाण्याचे शुद्धीकरण यासह आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती संबंधी प्रकल्पांचा समावेश होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प पाहण्यासाठी पालक देखील उपस्थित होते. आपल्या पाल्यांचे आधुनिक विज्ञानाशी संबंधित प्रकल्प पाहून पालकांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शाळेतील शिक्षिका आमेना बोहरा यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या…
पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास
आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !
Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली