हॅलो राजकारण

Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’

हॅलो जनता न्युज, जालना :

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshamukh) यांची ९ डिसेंबर २०२३ रोजी अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली, आणि या हत्येचा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय बनला आहे. हत्येची तपास प्रक्रिया सुरू असतानाच, हत्येतील आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. यानंतर, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, तसेच बीड आणि जालना जिल्ह्यात निषेध मोर्चे देखील निघत आहेत.

आज जालना जिल्ह्यात संतोष देशमुख (Santosh Deshamukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख अत्यंत भावुक होऊन बोलताना दिसली. “पप्पा, जिथे आहात तिथे हसत राहा,” असं म्हणत ती आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत होती.

वैभवी देशमुख म्हणाली, “आज आमचा आनंद आम्हाला हिरावून घेतला आहे, पण इथे जमलेल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही उभे राहू शकलो. तुमच्या मदतीमुळेच आम्ही न्यायासाठी लढू शकत आहोत. आपल्याला न्याय मिळवायचा आहे. यासाठी कृपया, मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहा आणि सदैव उभे राहा.”

तिने मराठा समाजाला उद्देशूनही एक भावनिक संदेश दिला, “तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे. आम्ही जेव्हा रस्त्यावर चालत होतो तेव्हा, तुम्ही आम्हाला धक्काबुक्की होऊ न देण्यासाठी हात जोडून विनंती केली. यासाठी मी तुमचे आभार मानते. माझ्या वडिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. मला एकच प्रश्न आहे – तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारलं? त्यांना किती वेदना झाल्या असतील? मला याचं उत्तर हवं आहे.” या शब्दांनी तिचा कंठ दाटला आणि ती भावुक होऊन थांबली.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…

E cabinet : महाराष्ट्रात राबविले जाणार ‘ई – कॅबीनेट’

Jalgaon Crime : लाच घेताना तलाठ्याला एसीबीने पकडले रंगेहाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button