Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…
हॅलो जनता न्युज, जळगाव
जळगाव जिल्हा परिषदेचे (Jalgaon ZP) मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवार दि. ६ जानेवारी रोजी जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अचानक भेटी देऊन आढावा घेतला होता.या अचानक दिलेल्या भेटी वेळी विना परवानगी गैरहजर आढळून आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या (Jalgaon ZP) अंतर्गत येणाऱ्या पारोळा तालुक्यातील शेळावे प्राथमिक आरोग्य केंद्र,अमळनेर तालुक्यातील पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्र,तसेच पातोंडा येथील पशुवैद्यकीय दवाखाना व पातोंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी सोमवारी अचानक भेट देऊन आढावा घेतला होता. अत्यंत गोपनीय पद्धतीने अचानक दिलेल्या या भेटी वेळी काही कर्मचारी व अधिकारी विना परवानगी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले होते. त्यासोबतच काही ठिकाणी कार्यालयीन दप्तर अद्ययावत नसल्याचे निदर्शनास आल्याने सबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे विरुद्ध शिस्तभंग विषयक प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…