हॅलो राजकारण

Jalgaon BJP : भा.ज.पा. सदस्य नोंदणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार

हॅलो जनता न्युज, जळगाव

आज, सद्गुरु नगर येथील तृप्ती कॉर्नरवर भाजपा (Jalgaon BJP) सदस्य नोंदणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि नेतृत्वात अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेषतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नरेंद्र मोदी, खासदार स्मिताताई वाघ, तसेच जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजू मामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात, जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, उत्तर महाराष्ट्र सदस्य नोंदणीचे संयोजक डॉ. राधेश्याम चौधरी, आणि अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदस्य नोंदणी करत असताना विशेष लक्ष वेधून घेतले ते, एक लाडकी बहिणीने स्वतःहून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करून घेतली आणि भाजपच्या ध्येयाशी एकनिष्ठतेने प्रतिसाद दिला.

सदस्य नोंदणी कार्ड वितरित करताना आमदार राजू मामा भोळे, जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, भाजपचे महेश भाऊ जोशी, उपाध्यक्ष प्रदीप रोटे, संतोष जी इंगळे, सुचित्रा ताई महाजन, आयुष्यमान सेल शहर प्रमुख योगेश निंबाळकर, युवा मोर्चा सरचिटणीस जितेंद्र चौथे, सोशल मीडिया प्रमुख मंक्र 3 मनोज निंबाळकर, भूत प्रमुख गौरव निंबाळकर, हरीश वाघमारे, गणेश मुळे आणि चिराग चौधरी यांसारखे सक्रिय कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे

Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी

Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button