Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान
हॅलो जनता न्युज, जळगाव :
एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता भीषण आग लागली. कंपनीत कच्च्या व तयार मालाचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. तीन तासांनंतरही आग आटोक्यात आली नव्हती. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
कामगारांच्या माहितीनुसार, कंपनीतील पत्र्याच्या दुसऱ्या मजल्यावरील शेडमध्ये असलेल्या कुलरच्या केबलमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच तिसऱ्या शिफ्टसाठी हजर असलेले १० ते १५ कामगार सुरक्षितरित्या बाहेर पडले.
आग विझवण्यासाठी व्यापक प्रयत्न
आग विझवण्यासाठी जळगाव, भुसावळ, वरणगाव, दीपनगर आणि चाळीसगाव येथून आठ ते दहा अग्निशमन बंब मागवण्यात आले. तसेच, जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने कंपनीची साइड वॉल तोडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.
Jalgaon MIDC : प्रशासनाची तत्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार शीतल राजपूत आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले.
मोठ्या प्रमाणावर मालाचे नुकसान
कंपनीतील चटईचा कच्चा आणि तयार माल जळून खाक झाला असून, यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत.
Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी
ब्रेकिंग न्युज : जळगाव जिल्ह्यात आयोजित अजय अतुल यांचा कार्यक्रम रद्द, “हे” आहे कारण